चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेचा उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन सोहळा
उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन खासदार नारायण राणे,आमदार भास्कर जाधव,आमदार शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती

पवन न्यूज जाहिरात….*
चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकणात अग्रगण्य असलेली लोकप्रिय चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय आणि मुख्य शाखेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उद्या गुरुवार दि.१९ मार्च रोजी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यामध्ये खासदार नारायण राणे,आमदार भास्कर जाधव,आमदार शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
चिपळूण शहराच्या बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या चिपळूण अर्बन बँकेची प्रगती सातत्याने सुरू असून बँकेची नवी वास्तू आता लवकरच ग्राहकांच्या सेवेत येणार आहे.उद्या गुरुवार दि. १९ मार्च रोजी चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. शिवसेना नेते गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरीचे सोपान शिंदे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल उपाध्यक्ष धनंजय खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, संचालिका राधिका पाथरे, निहार गुडेकर, निलेश भुरण, रहिमान दलवाई ,प्रशांत शिरगावकर, समीर जानवरकर, गौरी रेळेकर ,राजेश कळसकर, मिलिंद कापडी, रत्नदीप देवळेकर, समीर टाकळे ,सुनील खेडेकर ,संपदा रेडीज , दिलीप दळी, विवेक रेळेकर,दिनेश रेडीज ,श्रीराम देवळेकर, सतीश खेडेकर, विराज दळी, मधुसूदन माने आदी मान्यवर या कार्यक्रमाला विविध मान्यवर, बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.चिपळूण अर्बन बँक ही अनेक वर्षांपासून ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे. बँकेची नवी वास्तू अत्याधुनिक सुविधा व प्रशस्त जागेसह उभारण्यात आली असून यामुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर व जलद सेवा मिळणार आहे.या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण असून बँकेच्या प्रगतीमुळे चिपळूणच्या बँकिंग क्षेत्रात आणखी भर पडणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.




