Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

 गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामपूर गुढे फाटा येथे गौरव पाटेकर प्रतिष्ठानचा शुभारंभ

जेष्ठ पत्रकार अनिलकुमार जोशी यांच्या हस्ते उद्घाटन

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण तालुक्यातील रामपूर गुढे फाटा येथे उमरोली प. स. गण समितीचे सदस्य गौरव पाटेकर यांनी पक्षविरहित गरीब, गरजू, सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी गौरव पाटेकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य स्थापन केले याचे उद्घाटन श्रीफळ वाढवून रामपूर मार्गताम्हणे पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार जोशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी विजय पाटेकर, प्रभाकर जाधव, संदिप चव्हाण, वीरधवल मोरे, बावा पाटेकर यांनी श्रीफळ वाढवून शुभेच्छा दिल्या. गौरव पाटेकर प्रतिष्ठान नामफलकाचे अनावरण अनिल कुमार जोशी, डॉ. जगदीश पाटेकर यांनी केले. या गौरव पाटेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षद शिर्के, स्वप्नील रहाटे कार्याध्यक्ष, चंद्रकांत राऊत सल्लागार, सेक्रेटरी रुपेश गिरी, खजिनदार अमित वाघे, उपाध्यक्ष सुचित पाटेकर, सहसेक्रेटरी सुनिल निकम, मुकेश देसाई सहखजिनदार, सदस्य मंगेश गुढेकर, शशिकांत चव्हाण, अक्षय भालेकर, संतोष गावणंग यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी उमरोली जि.प. सदस्य प्रमोद निवळकर, प्रभाकर जाधव, बावा शेठ पाटेकर, डॉ. जगदीश पाटेकर, वीरधवल मोरे, सतीश काका जाधव, संदिप चव्हाण, संदिपशेठ घाग,सतीश जाधव, किरण पाटेकर, प्रवीण निवळकर, अनिकेत तटकरे, मुन्नाशेठ पाटेकर, विजय पाटेकर मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत प्रास्ताविक व प.स.गण सदस्य गौरव पाटेकर यांनी केले. गौरव पाटेकर प्रतिष्ठान कार्यकारिणीचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन बावाशेठ पाटेकर यांनी सत्कार केला. पक्षाविरहित प्रतिष्ठान सर्वांना योग्य न्याय, समस्या सोडविणे, विकास कामांना प्राधान्य देणार असल्याने अनिलकुमार जोशी यांनी अभिनंदन करून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गौरव पाटेकर प.स.सदस्य, प्रमोद निवळकर जि.प. सदस्य हे जोशी सरांचे विद्यार्थी आहेत. यावेळी जि.प. सदस्य प्रमोद निवळकर, प्रभाकर जाधव, सुरज पाटेकर, संदीप सावंत, डॉ. जगदीश पाटेकर यांनी मनोगते व्यक्त केली. गौरव पाटेकर यांनी समारोप केला.

फोटो : पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर यांचा सत्कार करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल कुमार जोशी आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (पवन फोटो सेवा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!