नगरसेवक अजय भालेकर यांनी जपली सामाजिक ऐक्क्याची परंपरा
मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन साजरी केली रमजान ईद

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण नगरपरिषद प्रभाग क्रमांक चार शिवसेना पक्षाचे नगरसेवक अजय भालेकर यांनी शनिवारी मुस्लिम बांधवांच्या सोबत रमजान ईद साजरी केली. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे चिपळूण शहरातील भेंडी नाका येथील मापारी मोहल्ला मशिदी जवळ रमजान ईद साजरी करण्यात आली.सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा
यांचा प्रत्यय देणारा एकात्मतेचा संदेश ईद-उल-
फितरच्या निमित्ताने शनिवारी चिपळूणमध्ये पुन्हा
एकदा अनुभवायला मिळाला. शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मापारी मोहल्ला
मस्जिद येथे ईदच्या नमाज पठनानंतर
मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन रमजान ईदच्या पवित्र
आणि आनंददायी पर्वाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या उपक्रमातून सणांच्या माध्यमातून समाजात बंधुभाव,
प्रेम, एकात्मता आणि सौहार्द वृद्धिंगत करण्याचा संदेश
देण्यात आला. “ईदचा हा सण केवळ धार्मिक उत्सव
नसून, समाजाला जोडणारा आणि मानवतेचा दीप
प्रज्वलित ठेवणारा आहे,” अशा भावना उपस्थित
मान्यवरांनी व्यक्त केल्या.
सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराची परंपरा
जपणाऱ्या अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर
ऐक्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी
अधोरेखित झाले.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे चिपळूण लायन्स क्लबचे सदस्य नवनिर्वाचित नगरसेवक अजय भालेकर यांनी मुस्लिम बांधवांना सोबत घेत अनोख्या पद्धतीने रमजान ईद साजरी केली प्रत्येक मुस्लिम बांधवाला पुष्प देत ईदेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भेंडी नाका परिसर, मापारी मोहल्ला येथील हिंदू – मुस्लिम बांधव एकत्र जमले होते.हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना इदेच्या शुभेच्छा दिल्या प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका वैशाली शिंदे ,नगरसेवक संजय गोताड, चिपळूण अर्बन बँक माजी संचालक विलास चिपळूणकर,पार्थ जागृष्ठे,सुरेश पाथरे, सचिन लकेश्री, संदीप मनोरकर, गणेश गांधी, प्रकाश साडविलकर,लवेश मापुस्कर, प्रसाद मापुस्कर, पंकज सावंत, उमर मिठागरी,मुराद कोकाटे,साजिद भाटकर, शकील भाटकर, नादीश उंडरे, शाहिद कुंडरे,तनवीर दळवी आदी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून शिवसेना नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
फोटो : मुस्लिम बांधवांसोबत ईद साजरी करताना शिवसेना नगरसेवक अजय भालेकर, नगरसेविका वैशाली शिंदे आणि हिंदू मुस्लिम बांधव छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




