शेकडो कार्यकर्त्यांसोबत उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश
चिपळुणात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का

चिपळूण (ओंकार रेळेकर) तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून उमेश खताते यांची ओळख आहे आता त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे संघटन अधिक बळकट होईल खताते यांच्या मागे संपूर्ण शिवसेना ताकतीने उभी राहील त्यांचा पुढील काळ उज्वलच आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.ठाकरे शिवसेनेचे चिपळूण युवासेना प्रमुख उमेश खताते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत मंगळवारी ना.शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थान शिवसेनेत प्रवेश केला.सदर प्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वा खाली आणि माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
उमेश खताते, संदेश शिगवण,विजय शिर्के, ओंकार पंडित, दीप्ती देसाई, इकबाल बेबाल,विराज खताते, समीर कदम, मुराद चौगुले, वहाब बेबल, सुमित भुरण, दीप्ती सावंतदेसांई, संदेश शिगवण, संतोष मिरगल, प्रफुल चाळके, अमित कांबळी, अमन कडवेकर,मुबारक सकवारे, अनिल पाटील, सचिन धांडे, लक्ष्मण शेळके, अमन कडवेकर,मुबारक सकवारे, अनिल पाटील,सुमेध भुरण,दीप्ती भुरण,साहिल भुरण ,अखिलेश खेडेकर,रुपेश खताते ,मयूर भालेकर,मंगेश भुरण,शुभम महाडिक,विशाल खताते,स्वप्नील जंगम,सुशील संगम,मंगेश गायकवाड,शुभम मिरगळ,योगेश खताते,सुमित खेडेकर,शौकत चौगुले,ओंकार जंगम,निनाद नाचरे वेदांत कदम,सारिका कदम,शिल्पा खताते ,स्वाती खताते अमये शिगवनआणि अनेक कार्यकर्ते यांच्यासह सुमारे साडेतीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी उमेश खताचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी स्वतः या कार्यकर्त्यांचा सत्कार करून पक्षप्रवेश झाला या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत फलोत्पादन मंत्री ना.भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम,माजी खासदार राहुल शेवाळे,माजी आमदार तथा शिवसेना उपनेते राजन साळवी, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण,शुभम साळवी आदी मान्यवर या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते.




