Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

नवभारत-नवराष्ट्र वृत्त समुहातर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

चिपळूण

चिपळूण : देशातील वृत्तसमूह असलेल्या दैनिक ‘नवभारत’ वृत्तसमूहाच्या दैनिक ‘नवराष्ट्र’तर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श व्यक्ती आणि संस्थांच्या सन्मान सोहोळ्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना नवराष्ट्र चे संपादक संजय मलमे यांच्या हस्ते ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल आ. शेखर निकम, वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य मान्यवरांनी सुभाषराव चव्हाण यांचे कौतुक केले.

हा सन्मान सोहळा चिपळूण शहरातील हॉटेल अतिथी ग्रँडच्या सभागृहात नुकताच दिमाखदार पार पडला. यावेळी आ. शेखर निकम, वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव, दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी गांधी, चिपळूण नगर परिषदेचे आरोग्य सभापती शुभम पिसे, नवराष्ट्रचे सरव्यवस्थापक सचिन फुलपगार आदी उपस्थित होते.

यावेळी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्ती, संस्था यांचा नवभारत-नवराष्ट्र वृत्तपत्र समुहातर्फे सन्मान करण्यात आला.

यावेळी आ. शेखर निकम यांनी नवराष्ट्र वृत्तपत्राच्या वाटचालीचे कौतुक करतांना नवराष्ट्र सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून व्यक्ती, संस्था यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल सुभाषराव चव्हाण यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कौतुक करतांना त्यांच्या वाटचालीचे कौतुक केले.

तर वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात सामाजिक, सहकार विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी काहीवेळा प्रसिद्धीपासून दूर असतात. या मंडळींना प्रकाशझोतात आणण्याचे काम नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाने हाती घेतले आहे, याबद्दल नवराष्ट्र या कार्यक्रमाचे यादव यांनी कौतुक केले. चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह काहींनी आपली वाटचाल कशी असावी, याचा आदर्श घालून दिला आहे. सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती कमी होत असली तरी नवराष्ट्र वृत्तपत्रात मंडणगडच्या टोकापासून ते सिंधुदुर्गच्या टोकापर्यंतच्या बातम्या आपल्याला वाचावयास मिळतात. नवराष्ट्र वृत्तपत्र रंगीत पानांचा भरगच्च असलेले वृत्तपत्र आहे. नवराष्ट्रने आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्याचे प्रशांत यादव यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘नवराष्ट्र’ च्या टीमने विशेष मेहनत घेतली. नवराष्ट्रचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रकाश वराडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, सखी थरवळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!