Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

उद्योजक सचिन पाकळे यांचा कामगारांसाठी कौतुकास्पद उपक्रम

आमदार चषक २०२६ मध्ये ३०० कूपनचा लकी ड्रॉ; कंपनीला लागलेली मोटारसायकल कामगारांना अर्पण

चिपळूण (ओंकार रेळेकर)शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक २०२०६ स्पर्धेनिमित्त उद्योगपती सचिन पाकळे यांनी ३०० कूपन खरेदी करून लकी ड्रॉमध्ये सहभाग घेतला होता. या सोडतीत त्यांच्या कंपनीच्या नावावर मोटारसायकल लागली. मात्र, ही मोटारसायकल स्वतःकडे न ठेवता कामगारांना देण्याचा निर्णय घेत त्यांनी कंपनीतील कामगारांमधून स्वतंत्र लकी ड्रॉ काढत सामाजिक बांधिलकी जपली.

चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ही सोडत पार पडली. सुभाष पाकळे फाऊंडेशनच्या माध्यमातून सचिन कात कंपनी व तिरुपती कात कंपनी, तसेच सचिन पाकळे व संजय पाकळे यांनी हा कामगाराभिमुख उपक्रम राबविला.
कामगारांमधून काढलेल्या या विशेष लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवान कामगाराला मोटारसायकल प्रदान करण्यात आली. याशिवाय मिक्सर, कुकर, हॉटपॉट, स्टील डबे, पाण्याच्या टाक्या, टॉर्च, इस्त्री, ब्लूटूथ स्पीकर, गॅस शेगडी, सिलिंग फॅन आदी वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास पूनम पाकळे, इरा डेव्हलपमेंटचे सुरेश सावर्डेकर, महावितरणचे निवृत्त अधिकारी अशोक काजरोळकर, शेखर निकम प्रतिष्ठानचे देवराज गरगरटे, सतीश सावर्डेकर, राजेश सुर्वे, विकास भंडारी, सुमित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार शेखर निकम, उद्योगपती सचिन पाकळे तसेच सचिन कात व तिरुपती कात कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदिप घाग, सचिन गुरव, बाळा सावंत, सुयोग खेडेकर, सुरेश सूर्यवंशी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, सुगंधा घाणेकर, सुरक्षा घाग, प्रणय साबळे, अनुराग चव्हाण, प्रणय मोरे, महेश सावंत, अमित म्हापार्ले, राहुल पवार, सुमित, सुजित बिजितकर आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कामगारांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो : क्रिकेट स्पर्धेत लकी ड्रॉ द्वारे मिळालेल्या बक्षिसच्या संचासह आ.शेखर निकम,उद्योजक सचिन पाकळे आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!