Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

दिव्यांग खोका प्रकरणावरून शिवसेना आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिवसैनिकांची धडक

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण नगर परिषदेतील दिव्यांग कोट्यातील खोका वाटप प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणात नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांच्यावर करण्यात आलेल्या कथित आरोपांच्या निषेधार्थ आज शिवसेना चिपळूण शहरचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शेकडो शिवसैनिकांनी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या दालनात धडक देत जोरदार भूमिका मांडली.
शिवसेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिव्यांग कोट्यातील खोका वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. निवेदनानुसार, मूळ लाभार्थी दीपक रामचंद्र म्हाडे यांच्या नावावरील खोका अन्य व्यक्तीच्या नावावर वर्ग करण्यात आला. तसेच जयश्री जयसिंग सावंत यांना नियमबाह्य पद्धतीने लाभ देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी शिवसैनिकांनी मालमत्ता विभागाचे अधिकारी सागर शेडगे यांच्यावर गंभीर आरोप करत, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. २०१८ पासून प्राप्त झालेल्या सर्व दिव्यांग अर्जांची तपासणी, पात्र लाभार्थ्यांची पडताळणी तसेच शासन नियमांचे पालन झाले का याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सांगितले की, सदर खोका वाटप प्रक्रिया प्रशासनाच्या कार्यकाळात झाली होती. तसेच मालमत्ता अधिकारी सागर शेडगे यांनी नगराध्यक्षांना ‘जयश्री जयसिंग सावंत यांना खोका मी माझ्या अधिकाराखाली दिला आहे,’ असे सांगितले होते. मात्र, असे विधान करणे ही त्यांची चूक असल्याची कबुली मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक आणि पदाचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणीही शिवसेनेच्या निवेदनात करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी संजय जाधव यांना निवेदन देताना शिवसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्याला तातडीने समोर बोलावून घेण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी दालनात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. “जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षांचा अवमान आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांवर घाला घालणारा प्रकार शिवसेना सहन करणार नाही,” अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली.
दरम्यान, “दिव्यांग बांधवांच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही प्रकार शिवसेना सहन करणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी चिपळूण पोलीस स्टेशन येथे शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.  अशा मुजोर अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करावी अन्यथा  शिवसेना चिपळूण शहरच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शिवसेना चिपळूण शहरच्या वतीने देण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी रश्मीताई गोखले, गटनेते अंकुश आवले, बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणी सभापती निहार कोवळे, शिक्षण सभापती हर्षाली पवार, महिला व बालकल्याण उपसभापती पल्लवी महाडिक, नगरसेविका निलम जाधव,नगरसेवक उदय जुवळे, नगरसेवक प्रमोद बुरटे,नगरसेवक विकी लवेकर, महिला आघाडी शहर प्रमुख प्राजक्ता टकले, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, परिमल भोसले, सुरेश राठोड, युवा सेना शहर प्रमुख विनोद पिल्ले, राकेश देवळेकर, फैसल मेमन, विनोद कदम, प्रतीक्षा हरवंडे, विद्याधर महाडिक, विनायक रेडीज, भाऊ भाटकर,  सिद्धेश चव्हाण,  सुधीर पानकर, विशाल नारळकर, सुधाकर सकपाळ, करामत मिठागरी, दयानंद जुवळे,अनामिका हरदारे, यतीन कानडे, पप्पू लाने, संदेश गोरीवले, विजय उत्तेकर,वैभव चिपळूणकर, मंदार फटकरे, अर्चना कारेकर, ओंकार टकले, अपर्णा पवार, दिशा किंजळकर, गायत्री जोशी, रश्मी गोरीवले, सई महाडिक, संगीता हुंबरे, स्नेहल मोरे, वंदना पाटील   विशाखा उत्तेकर ,पूर्वा तांदळे, सुवर्णा साडविलकर, शुभम कदम, साई घडशी, नयन चव्हाण, अल्ताफ चौगुले, पूजा शिंदे आदी शिवसैनिक, महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : मुख्याधिकारी संजय जाधव यांच्याशी चर्चा करतांना नगरसेवक आणि कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!