Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

ज्ञानदीप भडगावचा अनुराग वाघमोडे 100 % गुणांसह राज्यात पहिला

सलग 25 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम

 

खेड : पवन न्यूज
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ,खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव या प्रशालेतील अनुराग महादेव वाघमोडे याने 100 % गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. तर वृषभ दिगंबर देवघरकर 99.60 % गुण मिळवून राज्यात तृतीय, दिशा दिलीप मोहिते 99.40 % गुण मिळवून राज्यात चौथी आली आहे. आर्यन बाळासाहेब भगत 98.80% गुण मिळवून प्रशालेत चौथा तर शिवराज राजेश सूर्यवंशी 98.40 % गुण मिळवून प्रशालेत पाचवा आला आहे. 46 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थ्यानी 90.00 % पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. वर्गातील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत.

विषयातील प्रथम विद्यार्थी

मराठी विषयात प्रथम वेदा दिनेश शिरीषकर 99 गुण

संस्कृत विषयात प्रथम अनुराग महादेव वाघमोडे 100 गुण
वेदा दिनेश शिरीषकर
विश्वश्री रोहिदास केंद्रे
आर्या गजेंद्र बेंद्रे

इंग्रजी विषयात प्रथम अनुराग महादेव वाघमोडे 98 गुण

गणित विषयात प्रथम वृषभ दिगंबर देवघरकर 100 गुण
दिशा दिलीप मोहिते
आर्य योगेश चिले
इंद्र संदेश पाटणे

विज्ञान विषयात प्रथम अनुराग महादेव वाघमोडे 100 गुण

समाजशास्त्र विषयात प्रथम अनुराग महादेव वाघमोडे 100 गुण

या विद्यार्थ्याना संस्थेचे सल्लागार व पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट, मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पर्यवेक्षक संतोष भोसले, वर्गशिक्षक रागिणी जामकर, सुनील यादव, दिलीप मोहिते, विनोद टेंबे, महादेव वाघमोडे, संदेश जाधव, शांतीलाल आव्हाड, रामचंद्र भिंगारे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, संस्था सदस्य रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!