Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

आ.भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नाने गुहागरात जिजाईच्या ५ नव्या गाड्या

गुहागर आगाराच्या सेवेत; प्रवाशांची गैरसोय दूर

 

गुहागर आगाराच्या सेवेत; प्रवाशांची गैरसोय दूर

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘जिजाई’ या नावाने सुरू केलेल्या नव्या एसटी बसगाड्या आता गुहागरवासीयांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. गुहागर आगाराला यापैकी पाच गाड्या प्राप्त झाल्याने ग्रामीण तसेच शहरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. नव्या गाड्या सेवेत दाखल झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत असून, आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे प्रवाशांनी आभार मानले आहेत.

गुहागर मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गुहागर आगारासाठी नवीन एसटी बसगाड्यांची आवश्यकता लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे १० नवीन गाड्यांची मागणी केली होती. या मागणीचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार गुहागर आगाराला पहिल्या टप्प्यात पाच ‘जिजाई’ बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत.

गुहागर आगारातून विविध मार्गांवर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, उपलब्ध बसगाड्यांची संख्या आणि वाढती प्रवासी संख्या यामध्ये तफावत असल्याने अनेकदा प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. नवीन गाड्या सेवेत दाखल झाल्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

आमदार श्री भास्करराव जाधव यांनी यापूर्वीदेखील गुहागर आगारासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून १० नवीन एसटी बसगाड्या मिळवून दिल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा १० गाड्यांची मागणी करून त्यापैकी पाच गाड्या गुहागर आगाराला मिळवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुहागरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी मिळाली आहे.

नवीन ‘जिजाई’ बसगाड्यांमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

नवीन गाड्या गुहागर आगाराच्या सेवेत दाखल झाल्याबद्दल प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. गुहागरच्या प्रवाशांच्या वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा करून नवीन एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे प्रवाशांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!