महाराष्ट्र
धामणंद काजू फाटा–निवे रस्त्यालगत गटार व नाले सफाई कामास सुरुवात
आंबडस पंचायत समिती सदस्या अमिताताई बने यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांत समाधान

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना नेते, माजी कॅबिनेट मंत्री तथा गुहागर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आंबडस पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ. अमिताताई बने यांनी दिनांक २९ मे २०२६ रोजी केलेल्या मागणीनुसार धामणंद काजू फाटा ते निवे या रस्त्यालगत गटार व नाल्यांच्या साफसफाईच्या कामास कालपासून प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.सुरुवात करण्यात आली आहे.
सदर कामाची पाहणी पंचायत समिती सदस्या सौ. अमिताताई बने यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन केली. यावेळी ग्रामस्थ मोहन जाधव तसेच युवासेना विभागप्रमुख रोहित बने, पोलीस पाटील समीर म्हापदि, मोहन जाधव उपस्थित होते. रस्त्यालगत साचणारे पावसाचे पाणी, गटारांमध्ये वाढलेला गाळ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले आहे.गटार काढणे व नाले साफसफाईचे काम सुरू झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कामामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात उपाय होणार असून वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनालाही दिलासा मिळणार आहे.दरम्यान, काही ठिकाणी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन, ग्रामस्थांचा ये-जा मार्ग, वीज खांब तसेच मोबाईल टॉवरसाठी टाकण्यात आलेल्या फायबर केबल्स गटाराच्या मार्गात येत असल्याने काम अत्यंत सावधगिरीने व संथगतीने करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्या सौ. अमिताताई बने यांनी केले आहे.
फोटो : कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करताना पंचायत समिती सदस्या अमिता बने रोहित बने,मोहन जाधव,समीर म्हापदि आणि शिवसेनेचे कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




